इयत्ता 10 वी - मराठी (पद्य विभाग)
* कविता- उत्तम लक्षण * कवी - संत रामदास * काव्यसंग्रह - श्री दासबोध * कवितेचा सारांश /विषय - संत रामदास यांनी 'उत्तम लक्षण' या कवितेत आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. * कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे - मला ही कविता आवडली, कारण आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगणारी ही संत रामदासांची उत्तम रचना आहे. दैनंदिन जीवनात काय करावे व काय करू नये हे त्यांनी अनेक उदाहरणांवरून सांगितले आहे. आपले आचरण उत्तम असावे, विवेकाने वागावे, जेणेकरून आपली लोकप्रियता वाढेल. असा संदेश कवी संत रामदास यांनी या कवितेतून दिला आहे. कविता- वस्तू कवी- द. भा. धामणस्कर काव्यसंग्रह - भरून आलेले आकाश कवितेचा सारांश/ विषय- निर्जीव वस्तूंनाही भावना असतात हे समजून त्यांच्याशी वागावे, त्यांना जपावे. या भावना कवी द. भा. धामणस्कर यांनी व्यक्त केल्या आहेत. कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे- ही कविता म्हणजे मुक्तछंद काव्याचा प्रकार असून ही कविता मला खूप आवडली. ज्या वस्तू आपण दीर्घकाळ वापरतो त्या वस्तूंशी आपले एक भावनिक नाते तयार झालेले असते. वस्तू निर्जीव असल्या तरी त्यांनाही भावना आहेत, असे समजून आ...
Comments
Post a Comment