10 वी - मराठी (रसग्रहण)
जनीं आर्जव तोडू नये । पापद्रव्य जोडू नये । पुण्य मार्ग सोडू नये । कदाकाळी ॥ आशयसौंदर्य - वरील काव्यपंक्ती ही 'उत्तमलक्षण' या कवितेतील आहे. या कवितेचे कवी संत रामदास आहेत. उत्तमलक्षण ही कविता 'श्रीदासबोध' या ग्रंथातून घेतली आहे. या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना 'काय करावे' आणि 'काय करू नये' याबाबत संत रामदासांनी मार्गदर्शन केले आहे. काव्यसौंदर्य - समाजात राहत असताना समाजातील प्रत्येक व्यक्तीशी आदर्श वर्तन केले पाहिजे. वाईट मार्गाचा अवलंब करून धनसंपत्ती मिळवू नये. जीवन जगत असताना पुण्य मार्ग कधीही सोडू नये. नीतीधर्माने वागणे हाच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. तो आपण स्वीकारला पाहिजे. हा संदेश संत रामदास यांनी या काव्यपंक्तीतून दिलेला आहे. भाषिक वैशिष्ट्ये - 'उत्तमलक्षण' ही शांत रसाचा अनुभव देणारी रचना आहे. या रचनेत यमक साधणारे शब्द आलेले आहेत. जसे - 'भांडो नये - तंडो नये'. या कवितेचा रचनाप्रकार ओवी हा आहे. अपकीर्ती - सतकीर्ती व सांडावी - वाढवावी या विरोधी शब्दांमळे काव्यपंक्...